
मुंबई – काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी अहमदनगरच्या जागेचा वाद निर्माण झाल्यानंतर थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबईत येथे मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मंत्री गिरीश महाजन, आमदार राम कदम, आमदार कर्डीले आदि भाजप नेते यावेळी उपस्थित होते.
विखे पाटलांच्या मुलाचा अखेर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
संजय विखे पाटील यावेळी म्हणाले, मी आणि माझ्यासोबतच्या युवकांनी पंतप्रधान मोदींचे नेतृत्व आणि कर्तृत्व पाहून भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी माझ्या संकटाच्या काळात मला आधार दिला. त्यामुळे नगर जिल्ह्यात भाजपचा विस्तार करण्याचा शब्द देत असल्याचे विखे यांनी यावेळी सांगितले.
हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. यात माझ्या घराच्यांची काही भूमिका नाही. यापुढे मी भाजपचेच काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी हजारोंच्या संख्यने सुजय विखे पाटील यांचे समर्थकही उपस्थित होते. अहमदनगरच्या जागेचा वाद निर्माण झाल्यानंतर सुजय विखे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले.
