पॉर्न स्टारच्या भूमिकेत दिसणार ‘शिवगामी’

ramya-krishnan
बाहुबली चित्रपटातील मेरा वचन ही मेरा शासन हा डायलॉग तुम्हाला खूप आवडला असेल यात काही शंका नाही. पण या डॉयलॉगमुळे चित्रपटातील शिवगामी देवा अर्थात अभिनेत्री रम्या कृष्णन चर्चेत आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा रम्या कृष्णन आपल्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रम्या कृष्णन एका पॉर्न स्टारच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘सुपर डिलक्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यागराजन कुमार राजा हे करत आहेत. रम्या या चित्रपटाच्या शूटिंगसाठी खूप मेहनत करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

एका पॉर्न स्टारची भूमिका या चित्रपटात मी साकारत आहे. मला या चित्रपटातीलएक सीन करण्यासाठी 2 दिवस लागल्याचे रम्याने एका मुलाखती दरम्यान सांगितले आहे. रम्या म्हणाली की, माझ्यापेक्षा माझा असिस्टंट या भूमिकेमुळे जास्त चिंतेत आहे. काही भूमिका या पैशासाठी असतात तर काही भूमिका पॅशनसाठी असतात. सुपर डिलक्स हा रोल माझ्यासाठी एक पॅशन आहे.

तर रम्याची पॉर्न स्टारच्या भूमिकेसाठी निवड म्हणजे जरा विचित्रच असल्याचे चित्रपटाच्या पटकथा लेखकाने म्हटले आहे. सध्या रम्याच्या या भूमिकेमुळे चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. 29 मार्चला ‘सुपर डिलक्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment