
2018मध्ये रिलीज झालेला आयुष्मान खुरानाचा अंधाधून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाल्यानंतर हा चित्रपट आता चीनमध्ये देखील रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. अत्यंत कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तिकीटबारीवर 100 कोटींपेक्षा जास्तची कमाई केली होती. चीनमध्ये हा चित्रपट आता ‘पियानो प्लेअर’ या नावाने रिलीज होणार आहे.
चीनमध्ये ‘पियानो प्लेअर’ म्हणून रिलीज होणार आयुष्मानचा ‘अंधाधून’
आजवर अनेक भारतीय चित्रपटांना चीनमधील प्रेक्षकांनी पसंती दिल्याचे पाहायला मिळते. चीनी बॉक्स ऑफिस ‘बजरंगी भाईजान’, ‘हिचकी’, ‘हिंदी मिडीयम’, यांसारख्या चित्रपटांनी गाजवल्यामुळे आता चीनमध्ये ‘अंधाधून’ हा चित्रपट देखील रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
Celebrating Viacom18 Studio’s first China release with #AndhaDhun, known as ‘Piano Player’ in China#Tabu @ayushmannk #RadhikaApte #SriramRaghavan #Viacom18Movies @matchboxpix @ZeeMusicCompany @AndhadhunFilm pic.twitter.com/fwIQ5vZI1g
— Viacom18 Movies (@Viacom18Movies) March 11, 2019
नुकतेच ‘अंधाधून’चे चीनी पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. हे पोस्टर ‘व्हायाकॉम १८ मुव्हिज’ यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहेत. आयुष्मानचा चीनमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट आहे.
