व्हॉट्सअॅपमध्ये आलेल्या नव्या बगमुळे डिलीट होताहेत फोटो

whatsapp
नवी दिल्ली – तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेले व्हॉट्सअॅप आपल्या युझर्ससाठी नेहमीच काही ना काही नवीन फिचर्स घेऊन येत असते. नुकतेच काही अपडेट्स व्हॉट्सअॅपने आपल्या युझर्ससाठी आणले आहेत. पण हे अपडेट्स करण्याआधी थोडे थांबा नाही तर तुम्हाला भयंकर समस्येला समोरे जावे लागेल. युजर्स व्हॉट्सअॅपचे नवीन व्हर्जन 2.19.66 वर जसेच अपडेट करत आहेत तसेच त्यांचे फोटो आपोआप डिलीट होत असल्याचे समोर आले आहे. युजर्सला या बगमुळे समस्यांचा सामना करावा लागत आहे.

फोनमधून फोटोसह युजर्सचे चॅट पण ऑटोमॅटिक डिलीट होत आहेत. पण हे फोटो वैयक्तिक चॅटमधले डिलीट होत आहेत. ग्रुप चॅटमधील फोटो सुरक्षित असून ते युजर्सच्या गॅलरीमध्ये सेव्ह होत आहेत. हा मुद्दा युजर्सनी ट्विटरवर मांडला आहे. दुसऱ्या युजर्सना हे अपडेट डाऊनलोड न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अनेक युजर्सला व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्यात पण समस्या येत आहेत. बगमुळे स्टेटस ग्रे रंगात बदलत असल्याचे कळते. व्हॉट्सअॅपने अलीकडेच आक्षेपार्ह भाषा आणि धमकीवजा मॅसेजसंबंधी एक निर्देश प्रसिद्ध केला होता. यामध्ये जर कोणत्या युजरला असे मॅसेज येतात तर ते [email protected] वर यासंबंधी तक्रार नोंदवू शकतील. यानंतर पोलीस कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment