सलमानसोबत स्क्रिन शेअर करण्यास आलिया ‘राजी’ ?

alia-bhatt
तब्बल २० वर्षानंतर भाईजान सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लिला भन्साळी हे एकत्र येत असून संजय लिला भन्साळी हे सलमानला घेऊन चित्रपट तयार करणार आहेत. त्याच्यासोबत या चित्रपटात आलिया भट्ट हिची वर्णी लागली असल्याचे वृत्त आहे.

सध्या आलिया भट्ट यशाच्या शिखरावर असून बॉक्स ऑफिसवर तिच्या ‘राजी’, ‘गली बॉय’ या दोन्हीही चित्रपटांनी १०० कोटींच्या पुढे कमाई केली आहे. आलियाच्या या चित्रपटातील दमदार अभिनयामुळे तिच्याकडे यावर्षात अनेक चित्रपटांच्या रांगा लागलेल्या आहेत. यासंदर्भात एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, आलिया भट्ट संजय लिला भन्साळीच्या आगामी चित्रपटात भूमिका साकारणार आहे. पण या बातमीला अद्याप आलियाने दुजोरा दिलेला नाही.

त्याचबरोबर आलियाला ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी देखील त्यांच्या आगामी ‘आरआरआर’ या चित्रपटासाठी विचारले होते. पण सध्याच्या घडीला आलियाकडे बरेच चित्रपट असल्यामुळे तिने वेळेचे कारण देत या चित्रपटाला नकार कळवला आहे.

तुर्तास आलिया ‘ब्रम्हास्त्र’, ‘कलंक’ आणि ‘तख्त’ या तीन बिग बजेट चित्रपटात झळकणार आहे. तिचा ‘ब्रम्हास्त्र’ हा चित्रपट तमिळ, तेलुगु आणि हिंदी अशा तीन भाषेत प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा तेलुगु भाषेतील लोगो रिलीज करण्यात आला आहे.

Leave a Comment