मानवी शरीराबद्दलची ही तथ्ये तुम्हाला माहिती आहेत का?

body
मानवी शरीराची संरचना, त्याची कार्यपद्धती आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती असते. शाळेमध्ये आपण सर्वांनीच याचा थोडाफार अभ्यास केलेला असतो, आणि आजच्या नवनव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवी शरीराच्या बद्दल लावले जाणारे अनेक शोधही इंटरनेटच्या कृपेने आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचत असतात. पण तरीही मानवी शरीराशी निगडित अशी अनेक तथ्ये आहेत, ज्यांची माहिती आपल्याला फारशी नाही. ही तथ्ये जाणून घेऊ या.
body1
आपल्या डोळ्यांच्या पापण्यांची सातत्याने होणारी उघडझाप ही डोळ्यांना आर्द्रता देणारी आणि डोळ्यांमध्ये कचरा जाऊ नये यासाठी असते. यासाठी आपण एका मिनिटाच्या अवधीमध्ये साधारण पंधरा ते वीस वेळा पापण्यांची उघडझाप करीत असतो. पण यामागे आणखी एक तथ्य असे, की पापण्यांची उघडझाप होण्यासाठी लागणारा अवधी ही ‘माइक्रोनॅप’ म्हणजे अगदी क्षणभराची झोप असल्याचे वैज्ञानिक म्हणतात. या माईक्रोनॅपमुळे मेंदू रिचार्ज होत असून, यामुळे मेंदू अधिक सक्रीय राहण्यास मदत होते.
body2
मानवी शरीरामध्ये एकूण जितकी हाडे आहेत, त्याच्या चतुर्थांश हाडे केवळ मानवी पावलामध्ये असतात. मानवी पाऊल एकूण बावन्न हाडांचे मिळून बनलेले असते. त्याचबरोबर मानवी पावलामध्ये तेहतीस सांधे आणि शंभर स्नायू, टेंडन्स, आणि लिगामेंट्स असतात. तसेच आपल्या पोटामध्ये असणारी अॅसिड्स इतकी जास्त तीव्र असतात, की या अॅसिड्सच्या थेट संपर्कात आलेले रेझर ब्लेड चोवीस तासांच्या अवधीमध्ये अर्ध्याच्या वर वितळवून टाकण्याची क्षमता या अॅसिड्समध्ये असते.
body3
जर आपल्याला सर्दी झालेली असली, तर त्या जंतूंचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून शिंकताना नाकाजवळ रुमाल धरण्याची काळजी आपण घेत असतो. पण तरीही शिंकल्यानंतर हे जंतू केवळ आपल्या आसपासच नाही, तर आपल्यापासून सुमारे वीस फुटांच्या क्षेत्रामध्ये फैलावत असतात. त्यामुळे केवळ नाकावर रुमाल धरला की जंतू फैलावण्यापासून रोखता येतात असे नाही. माणसाला पाच संवेदना असल्याचे म्हटले जाते. स्पर्श, चव, दृष्टी, ऐकू येणे, आणि एखाद्या गोष्टीचा गंध या पंचेन्द्रीयांशी निगडित पाच संवेदना आहेत. पण या पाच संवेदानांच्या व्यतिरिक्त मनुष्याला निसर्गाने काही संवेदना आणखी दिल्या आहेत. यामध्ये वेदना, शरीराचे संतुलन राखणे, आणि शरीराच्या व आसपासच्या तापमानाची जाणीव या अतिरिक्त संवेदना मनुष्याकडे आहेत.

Leave a Comment