येथे महाबली हनुमान आहेत अस्थीतज्ञ

bones
भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणे. त्यांना संकटातून सोडविणे, भक्तांचे रक्षण करणे अशी अनेक कामे लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले बजरंगबळी हनुमान करतात असा दृढ विश्वास भाविकांमध्ये असतो. त्यामुळे देशात असे चमत्कार करणारी अनेक हनुमान मंदिरे आहेत आणि तेथे भाविकांची नेहमीच गर्दी असते. मात्र मध्यप्रदेशातील जबलपूर जवळ कटनी जिल्यात रीठी या गावात असलेले हनुमान मंदिर आणखी वेगळे आहे. येथे हनुमान तुटलेली, मोडलेली हाडे दुरुस्त करण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात.

हाडांच्या व्याधींनी त्रस्त झालेले रुग्ण या हनुमान मंदिरात हजेरी लावतात. अनेक वर्षे ही परंपरा सुरु आहे. मंगळवार, शनिवार येथे अतोनात गर्दी होते. येथे हाडाचे दुखणे घेऊन आलेल्या रुग्णाला डोळे बंद करून एक औषध पाजले जाते आणि पाहतापाहता वेदनेने कळवळणाऱ्या रुग्णांना दुखण्यात आराम पडतो.

हे औषध दिले जात असताना रामनामाचा जप करावा लागतो. या चमत्कारी गुणामुळे या मंदिराची कीर्ती अन्यत्र पसरली असून युपी, बिहार, मध्यप्रदेश, राजस्तान अस्य अन्य राज्यातून भाविक येथे येतात. येथे होणारे इलाज मोफत असतात मात्र दुखणे बरे झालेले भाविक त्यांच्या इच्छेनुसार दान करतात. येथे सांधे दुखीच्या वेदना कमी करणारे तेलही मिळते.

Leave a Comment