कॅनडात जगातील मोठा बर्फाचा चक्रव्यूह, गिनीज मध्ये नोंद

maze
जगातील सर्वात मोठे स्नो मेज म्हणजे बर्फाचा चक्रव्यूह अथवा भूलभुलैया कॅनडात बनविला गेला असून त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकोर्ड मध्ये केली गेली आहे. डिसेंबरपासून हा भूलभुलैया बनविला जात होता तो मार्च मध्ये पूर्ण झाला. स्नो मशीन आणि स्नो ब्लोअरच्या सहाय्याने कृत्रिम बर्फापासून तो बनविला गेला आहे.

या भूलभुलैयाच्या भिंती ६.५ फुट उंच व २ फुट रुंदीच्या आहेत. तो पार करण्यास ३० मिनिटे लागतात. गेल्या आठवड्यापासून तो पाहण्यासाठी रोज किमान १००० लोक गर्दी करत आहेत. क्लिंट मास याने तो तयार केला असून त्यासाठी त्याला त्याच्या पत्नीचे प्रोत्साहन आणि प्रेरणा होती. क्लिंट सांगतो नैसर्गिक बर्फापासून तो बनविणे अवघड होते कारण हा बर्फ लवकर वितळतो आणि तो नरम असतो. त्यामुळे कृत्रिम बर्फ वापरले गेले. हे बर्फ अधिक कडक असते. या बर्फापासून बनविलेल्या भिंतीना कार धडकली तर कार मोडेल इतके ते मजबूत आहे. हे मेझ बनविण्यासाठी ५७ हजार कॅनेडियन डॉलर खर्च आला आहे. भारतीय रुपयात ही किंमत ३० लाख आहे.

Leave a Comment