ऑटोमॅट ने भारतात सादर केला स्मार्ट फॅन

smartfan
होम सोल्यूशन ब्रांड ऑटोमॅटने भारतात स्मार्ट फॅन लाँच केला असून तो ३९९९ रुपयात कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर २० मार्च पासून विक्रीसाठी उपलब्ध केला जात आहे. ऑफलाईनसाठी २५० शहरात १००० स्टोर्समध्ये तो विकला जाणार आहे तर इ कॉमर्सवर २ एप्रिल पासून ग्राहक फॅन खरेदी करू शकणार आहेत.

हा फॅन मोबाईल अॅपने कंट्रोल करता येतो. कंपनीने या सोबत स्मार्टरेडी फॅन २९९९ रुपयात विक्रीसाठी आणला असून हा फॅन १००० रु. जादा भरून स्मार्ट फॅन मध्ये बदलता येणार आहे. या फॅन मुळे युजरला जुन्या ५ स्पीड लेवल मधून सुटका मिळणार आहे. कारण या स्मार्टफ़ॅनचा वेग ग्राहक त्याच्या गरजेनुसार ठरवू शकेल. त्यासाठी असलेले अॅप अँड्राईड युजर गुगल प्लेवरून डाऊनलोड करू शकणार आहेत.

यात ऑटोमोड ऑप्शन दिला गेला असून त्यानुसार खोलीतील तपमानानुसार फॅन स्वतः वेग कमी जास्त करेल. ब्रिज मोड मध्ये नैसर्गिक झुळूकीचा फील घेता येईल तर टर्बो मोडमध्ये हा फॅन टॉप स्पीडपेक्षा १० पट अधिक वेगाने फिरेल. यात गेस्ट फंक्शनही दिले गेले आहे. त्यामुळे घरी येणारे पाहुणे त्याच्या स्मार्टफोन वरून फॅन कंट्रोल करू शकणार आहेत.

Leave a Comment