गौतम गंभीर भाजप तिकिटावर नवी दिल्लीतून मैदानात

gambhir
माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर नवी दिल्ली मतदारसंघातून निवडून आखाड्यात उतरणार असल्याचे समजते. गौतमच्या निकटवर्तीकडून ही माहिती दिली गेली आहे. गौतमने क्रिकेट निवृत्तीनंतर राजकारणात येण्या संदर्भात विचार केला नसल्याचे निवृत्ती घेताना सांगितले होते. गौतम नेहमीच राष्ट्रवाद आणि भारतीय लष्कर यांच्या समर्थक राहिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या निवडणुकीत भाजपने दिल्लीतील सर्व ७ जागा जिंकल्या होत्या. यंदा तशी परिस्थिती नाही. त्यामुळे उमेदवार निवडताना विजयाची हमी लक्षात घेतली जाणार आहे. नवी दिल्ली मतदारसंघात सध्या भाजपच्या मीनाक्षी लेखी खासदार आहेत. त्या सुप्रिम कोर्टात वकिली करतात. गंभीरच्या निकटवर्तीयाकडून मिळालेल्या माहितीनुसार गंभीरने निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे भाजप नेत्याच्या कानी घातले आहे. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवाद हा महत्वाचा मुद्दा असेल आणि त्याचा फायदा गंभीरला होईल असा अंदाज आहे.

भाजपच्या काही नेत्यांसोबत गंभीरने चर्चा केली आहे मात्र अखेरचा निर्णय भाजपचे वरिष्ठ नेते घेणार आहेत असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment