वर्ल्ड वाईड वेब म्हणजे www झाले तीस वर्षाचे

wwww
संपूर्ण जगाला एकमेकाशी जोडून वसुधैव कुटुंबकम म्हणजे जागतिक कुटुंब बनविण्यात महत्वाची योगदान दिलेले वर्ल्ड वाईड वेब अर्थात www आज म्हणजे १२ मार्च रोजी ३० वर्षाचे झाले आहे. गुगलने त्याप्रीत्यर्थ एक खास डूडल बनविले आहे. वर्ल्ड वाईड वेबची सुरवात १२ मार्च १९८९ ला झाली असली तरी इंटरनेट त्याअगोदर अस्तित्वात आले होते.

गुगलने बनविलेल्या डूडल मध्ये गुगल ही अक्षरे डिजिटल भाषेत दिसत असून मध्ये १९९० च्या दशकातील संगणक दिसतो आहे. तो इंटरनेटला जोडलेला आहे. या वेबने जग जोडले तशीच युजरला ज्ञान मिळविण्याची अनंत साधने उपलब्ध करून दिली. टीम बर्नर याने याचा शोध लावला. बर्नरचा जन्म इग्लंडमधला. तो फिजिक्सचा पदवीधर होता. जगात पहिली वेबसाईट त्याने सुरु केली. तिचे नाव होते,
http://info.cern.ch/hypertext/www/Theproject.html. ही साईट ६ ऑगस्ट १९९१ हा सुरु केली गेली होती.

Leave a Comment