स्पेन आपली अश्लील प्रतिमा पुसून काढण्यासाठी करणार प्रयत्न

spain
स्पेनमधील मेजोरका आणि इबीझा बीच परिसरात खुलेआम सुरु असलेले अश्लील चाळे हे तेथील नेहमीचीच गोष्ट बनली आहे. बीचच्या परिसरातील रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी तरुण-तरुणी दारुच्या नशेत राडा करताना दिसून येतात. त्यांचे नशेत तर्र असतानाचे अश्लील चाळे आणि खुलेआम सेक्स करताना फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने देशाचे कुप्रसिद्धी होते. आता स्पेन सरकारने या सर्वच गोष्टींना आळा घालण्यासाठी नव्या 64 नियमांची यादीच जारी केली. सोबतच, त्यांच्या कठोर अंमलबजावणीच्या सूचना पोलिस आणि प्रशासनाला दिल्या आहेत. यापुढे, देशातील पर्यटन स्थळांची अश्लील प्रतिमा पुसून काढली जाणार आहे असे सरकारने ठरवले आहे.
spain1
नाइटलाइफ आणि अॅडल्ट पार्ट्यांसाठी जगभरात हे दोन्ही बीच कुप्रसिद्ध आहे. अशात सरकारच्या निदर्शनास सामान्य पर्यटकांची गर्दी सुद्धा कमी होत असल्याचे आले आहे. त्यामुळे, प्रतिमा सुधारण्याच्या दिशेने नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. बेलारिकचे टूरिझ्म चीफ बिल बार्सेलो यांनी सांगितल्याप्रमाणे, प्रशानाकडून नियमांना लागू करण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. सोबतच, लोकांना यांची माहिती करून देण्यासाठी मोहिम देखील राबवली जात आहे. यापुढे सार्वजनिक ठिकाणी असामाजिक कृत्य आणि अश्लील चाळे खपवून घेतले जाणार नाहीत.

Leave a Comment