अंतराळातील देशाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी हजारो भारतीयांचे अर्ज

space
रशियातील संशोधक आणि उद्योगपती डॉ. इगर अशरबेली यांनी स्थापन केलेली ऑस्ट्रिया देशातील व्हिएना शहरात एरोस्पेस इंटरनॅशनल रिसर्च सेंटर ही खासगी कंपनी तुमचे ताऱ्यांमध्ये राहण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे. कारण, काही वैज्ञानिकांनी तुम्ही पाहिलेले स्वप्न वास्तवात आणण्याची तयारी सुरु केली आहे. चक्क एक देश अंतराळात वसवण्याचा संकल्प या मंडळींनी केला आहे. अॅजगार्डिया असे या देशाचे नाव ठेवण्यात येणार आहे.
space1
आपल्यापैकी कोणीही या देशाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करु शकतो. Asgardia.com या संकेतस्थळावरुन या देशाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी आतापर्यंत ५० हजार लोकांनी अर्ज केले आहेत. अॅजगार्डियाच्या नागरिकत्वासाठी भारतीय लोक देखील प्रयत्न करत आहेत. या देशाचे नागरिकत्व मिळविण्यासाठी आतापर्यंत ११ हजार ३५७ भारतीयांनी अर्ज केले आहेत. संशोधक लेना द विन यांच्या मते अॅजगार्डियाचे नागरिकत्व देण्यापूर्वी लोकांच्या अर्जांची योग्य छाननी केली जाईल आणि नंतर त्यांना पासपोर्टही दिला जाईल.
space2
अद्याप या देशाची रुपरेषा निश्चित झालेली नसून पुढील वर्षी या देशाचा पहिला उपग्रह प्रक्षेपित केला जाणारा आहे तसेच अॅजगार्डियाच्या वेबसाईटवर पृथ्वीच्या कक्षेतील ही खरीखुरी नो मॅन्स लँड असेल असे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र देखील या देशाला मंजुरी देतील अशीही त्यांना आशा आहे. सध्या या देशाचे राष्ट्रगीत आणि ध्वज ठरवण्यासाठी स्पर्धाही घेतली जात आहे. या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय कायद्यांनी कशी परवानगी मिळेल यावर लंडन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस पॉलिसी अँड लॉ या संस्थेचे संचालक प्रा. सेड मॉस्टेशर यांनी शंका उपस्थित केली.

Leave a Comment