
नवी दिल्ली – दिल्लीमध्ये झालेल्या कॉंग्रेस बूथ कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपने त्यांना ट्रोल केले आहे. राहुल गांधी या कार्यक्रमात पुलवामा हल्ला आणि मसुद अजहरच्या मुद्यावरुन भाजपवर निशाना साधत होते. त्याचवेळी त्याच्या तोंडातून मसूद अजहरचा आदरार्थी उल्लेख झाला. त्यांनी मसूद अजहरजी असा त्या क्रुरकर्म्याचा उल्लेख केला. त्यानंतर भाजपने त्यांना ट्रोल केले आहे.
राहुल गांधींनी मसूदचा केला आदरार्थी उल्लेख, भाजपने केले ट्रोल
राहुल गांधी म्हणाले, की पुलवामा मधील हल्ला जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरने घडवला. 56-इंच छातीवाले आणि त्यांच्या मागील सरकारने विमानात मसूद अजहरजीसोबत प्रवास केला, ते आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहे. अजित दोभाल मसूद अजहरला कंधार येथे त्यांच्या साथीदारांच्या स्वाधीन करुन आले होते.
देश के 44 वीर जवानों की शहादत के लिए जिम्मेदार आतंकी संगठन जैश-ए-मोहम्मद के सरगना के लिए राहुल गांधी के मन में इतना सम्मान! #RahulLovesTerrorists pic.twitter.com/I8a9FY60cW
— BJP (@BJP4India) March 11, 2019
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असे वाटते की राहुल गांधी यांच्या तोडून चुकून मसूदचा आदरार्थी उल्लेख झाला आहे. कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी पहिल्यांदा मसूद अजहर, दुसऱ्यांदा मसूद अजहर जी आणि तिसऱ्यांदा मसूद अजहर असा उल्लेख केला. आता मसूदचा आदरार्थी उल्लेख राहुल गांधींना जड जाणार असेच दिसत आहे. कारण त्यांच्या वक्तव्याला भाजपने वादाची फोडणी देण्यात थोडाही वेळ लावलेला नाही.
