दीपा कर्माकर बार्बीच्या रुपात सादर

barbie
खेळणी बनविणारी कंपनी मेटेल ने कंपनीच्या साठाव्या वर्धापनदिन निमित्त अनोखा उपक्रम राबविला असून त्यात १७ देशातील १९ यशस्वी महिलंच्या बार्बी प्रतिमा बनविल्या आहेत. यात भारताची ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली पहिली जिमनॅस्ट दीपा कर्माकर हिचा समावेश केला गेला असून तिच्या रूपातील बार्बी तयार झाली आहे. यामागे तरुण पिढीला प्रेरणा देण्याचा उद्देश असल्याचे कंपनीने सांगितले.

karmakar
यासाठी ज्या महिलांची निवड केली गेली आहे त्या १८ ते ८५ या वयोगटातील आहेत आणि त्यात खेळाडू, मॉडेल, सामाजिक कार्यकर्त्या, पत्रकार अश्या सर्व थरातील महिलांचा समावेश आहे. दीपाने या मोहिमेत तिची निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

दीपाने आत्तापर्यंत विविध स्पर्धात ७७ पदके जिंकली असून त्यात ६७ गोल्ड पदके आहेत. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धांचा त्यात समावेश आहे. दीपा रिओ ऑलिम्पिक मध्ये जिमनॅस्टिक्स मध्ये सहभागी झालेली पहिली भारतीय जिम्नॅस्ट आहे आणि तिचे ब्राँझ मेडल केवळ एका गुणाने चुकले होते. एफ १६ आर्टिस्टिक जिमनॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कप मध्ये दीपाने तुर्कस्तान येथे गोल्ड मेडल मिळविले असून ही कामगिरी बजावणारी ती पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट आहे.

Leave a Comment