पहिल्यांदाच महानायकासोबत स्क्रिन शेअर करणार सिरीयल किसर

emraan-hashmi
यावर्षाच्या सुरुवातीलाच बॉलीवूडचा सिरीयल किसर म्हणजेच इमरान हाश्मी हा व्हाय चीट इंडिया हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा हिट झाला नव्हता. पण आता इमरान हाश्मी लवकरच बी-टाऊनचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका आगामी चित्रपटात स्क्रिन शेअर करणार आहे.

या संदर्भात एका प्रसारमाध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, बर्फ असे इमरान हाश्मी आणि अमिताभ बच्चन यांच्या या आगामी चित्रपटाचे नाव आहे. त्यांच्या व्यतिरिक्त अन्नु कपूर आणि सौरभ शुक्ला हेही या चित्रपटात झळकणार आहेत. रुमी जाफरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. जाफरी यांनी ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे न्यायाधीशाच्या भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.

Leave a Comment