जावेद अख्तरांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आगपाखड

javed-akhtar
मुंबई – ‘मुंबई कलेक्टिव्ह’ चर्चासत्राच्या तिसऱ्या आवर्तनाचे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. लेखक कंवल भारती, राजकीय विश्लेषक मंजरी काटजू यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सहिष्णूता यांसारख्या संवैधानिक मूल्यांना बाधा पोहचत आहे, तसेच ‘भारतीय लोकशाहीचे हिंदूकरण’ यावर मांडणी केली. त्याचबरोबर यावेळी प्रसिद्ध लेखक-पटकथाकार-गीतकार जावेद अख्तर यांनीही ‘धर्मनिरपेक्षता’ या विषयावर संवाद साधला. त्यादरम्यान जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना, देशाची राज्यघटना आणि झेंडा योग्य नसल्याचे संघ म्हणते. त्यांचा आयक्यू एवढा कमी आहे की, ते जास्त चालूही शकत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा धर्मांध असून मुस्लीम लीग आणि आरएसएस यांच्यातील सारखेपणा म्हणजे द्वेष करणे असल्याचे म्हटले आहे.

आपल्या देशात काही कथानक नसताना चित्रपट चालतात. आता तशीच परिस्थिती संघ आणि भाजपची झाली आहे. मोदींनी काय चांगले काम केले आहे, हे पण ते स्वत: पण सांगू शकत नाहीत. पण, ते अनेक गोष्टींचे श्रेय घेतात. इंदिरी गांधींची बरोबरी मोदींनी करून दाखवावी, हे त्यांना आव्हान असल्याचेही अख्तर यावेळी म्हणाले. प्रत्येक पक्षांनी आगामी निवडणूक ही रोजगार, शिक्षण, गरिबी आणि विकासावर लढावी, अशी इच्छा अख्तर यांनी यावेळी प्रकट केली.

देशाच्या संविधानावर गेल्या ५ वर्षांपासून हल्ला होत आहे, तो कोण करत आहे, हे तुम्हाला चांगलेच माहीत असल्याचे ते म्हणाले. स्वतःचे विचार न मांडू दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे ४ न्यायाधीश माध्यमांसमोर बोलतात, याला काय म्हणणार. त्यांच्या स्वातंत्र्यावर बहुधा ते खूश नसावेत. कारण, त्यांच्या स्वातंत्र्यावर सत्ताधारी घाला घालत असल्यामुळे त्यांना हे करावे लागले. सत्ताधारी सीबीआय, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग आपल्या दबावाखाली ठेवत असल्याचेही जावेद अख्तर यांनी म्हटले आहे.

Leave a Comment