पहिल्या वेबसिरीजसाठी खिलाडी कुमारने घेतले एवढे मानधन

akshay-kumar
सध्याच्या घडीला संपूर्ण जग डिजीटल होत असल्याचे आपण पाहतच आहात. त्यातच वेबसिरीजला डिजीटल विश्वात मिळणार प्रतिसाद पाहात, या डिजीटल विश्वात बी-टाऊनमधील अनेक कलाकारांनी प्रवेश केला आहे. आता त्या यादीत बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचा देखील समावेश झाला आहे. अक्षय कुमार अॅमेझॉन प्राईमच्या ‘द एंड’ या वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. पण त्याने आपल्या या पहिल्या वहिल्या वेबसिरीजसाठी अक्षयने रग्गड मानधन घेतले आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितनुसार, अक्षयने या वेबसिरीजमध्ये काम करण्यासाठी अनेक अटी ठेवल्या होत्या. त्यानुसार त्याला मानधन मिळणार आहे. त्याने ‘द एंड’मध्ये काम करण्यासाठी तब्बल ९० कोटी रुपये घेतल्याचे वृत्त आहे. ‘द एंड’ ही वेबसिरीज ही अॅक्शन, ड्रामा आणि थ्रिलरने परिपूर्ण असल्याचे अक्षयने सांगितले आहे. मी यामध्ये एन्ट्री डिजीटल विश्वाचे वाढते महत्व आणि तरुणाईचा असलेला प्रतिसाद यामुळे घेण्याचे ठरविले, असेही त्याने सांगितले. तसेच, डिजीटल विश्वात येण्याचा निर्णय मी माझ्या मुलामुळे घेतला असल्याचेही तो म्हणाला.

Leave a Comment