टीकटॉकने डिलीट केले वादग्रस्त युजर्सचे अकाउंट केले

tiktok
सध्याच्या तरुणाईमध्ये चीनमधील व्हिडिओ शेअरिंग अॅप टीकटॉकची चांगलीच चलती आहे. जगभरातील १०० कोटी लोक या अॅपचा वापर करतात. पण या अॅपमध्ये सध्याच्या घडीला वादग्रस्त व्हिडिओंना जास्त प्रोत्साहन देण्यात येत असल्याचा आरोप होत असून अल्पवयीन मुला-मुलींच्या वादग्रस्त व्हिडिओंना या अॅपमध्ये प्रोत्साहन देण्यात येत असल्याचा टीकटॉकवर आरोप होत आहे. टीकटॉकने यावर कठोर पाऊल उचलले असून अशा युजर्सचे अकाउंट आणि काही व्हिडिओ डिलीट करायला सुरुवात केली आहे.

याबाबत माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, टीकटॉक युजर्संनी दावा केला आहे, की त्यांचे अकाउंट बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आपले व्हिडिओ डिलीट करण्यात आल्याचे काही युजर्सनी म्हटले आहे. युजर्सचे म्हणणे आहे, की कोणत्याही प्रकारची माहिती न देता हे व्हिडिओ आणि अकाउंट डिलीट करण्यात आले आहेत.

दरम्यान आपल्या धोरणांमध्ये टीकटॉकने काही महत्वपूर्ण बदल केले असून या प्रायव्हसी पॉलिसीनुसार १३ वर्षापेक्षा ज्यांचे वय कमी आहे, अशा युजर्सचे अकाउंट बंद करण्यात येणार असल्यामुळे अॅपद्वारे युजर्सच्या वयाची माहितीही घेण्यात येत आहे. एफटीसी सेटलमेंट अॅग्रिमेन्टच्या नुसार टीकटॉकने हा निर्णय घेतला आहे. जर १३ वर्षाहून कमी वय असलेले मुले-मुली टीकटॉकवर अकाउंट बनवतात तर यासाठी त्यांना त्यांच्या पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. सध्या ही पॉलिसी अमेरिकेत लागू करण्यात आल्याचे समजते पण हे धोरण लवकरच भारतातही लागू करण्यात येणार असल्याचे समजते.

Leave a Comment