तब्येत बिघडली? या गुहेतील वास्तव्य बरा करेल आजार

guha
सर्वसाधारण जगातील बहुतेक सर्व देशात माणूस आजारी पडला तर डॉक्टरकडे जातो. पण ऑस्ट्रियातील एक गुहा थोडी अनोखी असून येथे आजारी लोक त्यांचे आजार बरे होण्यासाठी येतात आणि काही काळ या गुहेत झोपून रोगमुक्त होतात. अनेक रोगांवर या गुहेत येऊन झोप घेणे हा रामबाण उपाय असल्याचे सांगितले जाते.

हा चमत्कार नाही. पूर्वी या परिसरात लोक सोन्याच्या खाणींच्या शोधात आले होते. मात्र नंतर या गुहेत राहिलेल्यांना त्याचे आजार बरे होत आहेत असे जाणवले. या गुहेत रेडॉन वायूचे प्रमाण अधिक आहे. या वायूच्या संपर्कात आल्याने अनेक गंभीर आजार नष्ट होत असल्याचे दिसून आले आहे. हा वायू रेडीओअॅक्टीव्ह आहे आणि गुहेतील गरम वातारणात तो अधिक प्रभावी होतो असे सांगितले जाते.

austria
या गुहेत झोपल्याने संधिवात, त्वचा विकार यासारख्या व्याधी समूळ जातात असा अनुभव अनेकजण सांगतात. हा निसर्गोपचाराचा एक भाग मनाला जातो. केवळ ऑस्ट्रियातून नाही तर जगभरातून लोक येथे मुद्दाम येतात. या गुहेत येण्यासाठी खास ट्रेन आहे आणि डॉक्टरही येथे हजर असतात. ते तुम्हाला इलाज करवून घेण्यात मदत करतात.

Leave a Comment