विना मेकअप हवाई सुंदरी देऊ शकणार सेवा

vergin
व्हर्जिन एअर लाईन्स कंपनीने त्याच्या सेवेतील हवाई सुंदरींना मेकअप न करण्याची तसेच आखूड स्कर्ट ऐवजी तरा ट्राऊझर्स वापरण्याची परवानगी दिली आहे. विमान प्रवास म्हणजे प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असलेला केबिन क्रू आणि त्यातही खास हवाईसुंदरी हे समीकरण आलेच. नेहमी प्रफुल्लीत चेहऱ्याने, मेकअप मध्ये आणि अतिशय आखूड कपड्यात वावरणाऱ्या या हवाई सुंदरींना या सर्व प्रकारचा किती त्रास होत असेल याची कल्पना प्रवाशांना येत नाही. मात्र या सेविकांकडून त्यांना होणारे त्रास समजून घेऊन त्यानुसार नियमात बदल करण्याचे धैर्य व्हर्जिन अटलांटिक एअर लाईन्स या कंपनीने दाखविले आहे.

hostess
हवाईसुंदरींना कामावर येताना कंपनीच्या नियमाप्रमाणे कपडे, मेकअप करूनच कामावर यावे लागते. त्यांचे काम प्रवाशाना सर्व सुविधा पुरविणे इतकेच नसते तर आजारी प्रवाशाची काळजी, विमानांत आणीबाणी आली तर लहान मुले, आजारी, म्हातारे प्रवासी यांना धीर देणे. त्यांना हवी ती मदत देणे, प्रथमोपचार पुरविणे अशी अनेकविध प्रकारची असते. अनेकदा यात त्यांचे आखूड युनिफॉर्म त्यांना अडचणीचे ठरतात. त्यामुळे या विमानकंपनीने हवाई सुंदरीच्या कम्फर्ट लेव्हल जाणून घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी मते मागविली.

मिळालेल्या फीडबॅक वरून कंपनीने नियमात बदल केले आणि ज्या हवाईसुंदरींना मेकअप करायचा नाही अथवा आखूड कपडे घालायचे नाहीत त्यांना ती सवलत दिली आहे. यामुळे टीम वर्क अधिक चांगले होईल असा कंपनीचा दावा आहे.

Leave a Comment