झुकेरबर्गच्या सुरक्षेसाठी फेसबुक कार्यालात भुयार?

zukerb
अल्पावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झालेल्या फेसबुक या सोशल साईटचा सीइओ मार्क झुकेरबर्ग याच्या जीवाला असलेल्या धोका लक्षात घेऊन फेसबुकच्या कार्यालयात एक बुलेटप्रुफ केबिन आणि त्याखाली एक गुप्त भुयार तयार केले गेले असल्याचे सांगितले जात आहे.

गेले काही महिने फेसबुक डेटाचोरी आणि युजरच्या प्रायव्हसीबरोबर तडजोड केल्याच्या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे आणि त्याचा सर्वाधिक दोष मार्क झुकेरबर्गला दिला जात आहे. परिणामी त्याला जीवे मारण्याचे धमक्या दिल्या जात असून त्याची सुरक्षा वाढविली गेली आहे. त्याच्या सुरक्षेवर वर्षाला ७० कोटी डॉलर्स खर्च केले जात असून सुरक्षा टीमचे नेतृत्व अमेरिकेचा माजी सिक्रेट एजंट जिल लीवंस जोन्स याच्याकडे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मार्कच्या फेसबुक कार्यालयात बुलेटप्रुफ कॉन्फरन्सरूम तयार केली गेली असून याखालून एक गुप्त भुयार तयार केले गेले आहे. कार्यालयात काही आणीबाणी आलीच तर या भुयारातून तो कॅलिफोर्निया फेसबुक मुख्यालयाच्या पार्किंग मध्ये जाता येते. या पार्किंग मध्ये अन्य कुणी वाहने पार्क करू शकत नाही. मार्कच्या बे एरिया भातातील घराभोवती बंदुकधारी चोवीस तास तैनात आहेत आणि मार्क कोणत्याची कार्यक्रमासाठी जाणार असले तर ते सध्या वेशात सतत त्याच्यासोबत असतात.

फेसबुक कार्यालयाच्या आत सुद्धा मार्कच्या जीवाला धोका होऊ शकतो ही शक्यता गृहीत धरून त्याची सुरक्षा केली जात आहे.

Leave a Comment