डुकराने दिला चिम्पाझीला जन्म


एका शेतकऱ्याच्या डुकराने चिम्पाझीसारख्या दिसणाऱ्या पिलाला जन्म देण्याची धक्कादायक क्यूबात समोर आली आहे.

पश्चिम क्यूबातील पिनार डेल रिओप्रांतातील सान जुआन ई मार्टिनेज या गावात ही अजब घटना घडली आहे. तेथील एका शेतकऱ्याच्या डुकराने दहा पिलांना जन्म दिला. त्यातील एक पिलू चिम्पाझी माकडासारखे दिसत होते. या पिलाच्या कपाळाच्या मध्यभागी एकच डोळा होता. हे पिलू पाहून गावातील सर्व लोक थक्क झाले. तसेच त्याला पाहण्यासाठी गर्दी जमा झाली.

गर्दीतील कोणीतरी त्या पिलाची छायाचित्रे व व्हिडियो घेऊन सोशल मीडियावर टाकली. त्यामुळे ही बातमी झपाट्याने व्हायरल झाली.

त्यानंतर गावकऱ्यांनी या पिलाची तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकालाही बोलावले. या पिलाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते असे का दिसतेय, हे जाणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सान जुआन ई मार्टिनेज हा क्यूबातील शेतीप्रधान भाग आहे आणि तंबाखूची मक्का म्हणून त्याला ओळखले जाते.