काँग्रेसने अखेर माझी जागा मला दाखवून दिली – नवज्योत सिंह सिद्धू

navjyot-singh-sidhu
नवी दिल्ली – पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांना मोगा येथे पार पडलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रॅलीत न बोलावण्यात आल्याने वाद निर्माण झाला असून यावरुन नाराज झालेल्या सिद्ध यांनी, याआधी देखील पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्या 2004 मध्ये झालेल्या रॅलीत आपल्याला बोलण्यापासून थांबवण्यात आले होते. सिद्धू त्यावेळी भाजपमध्ये होते आणि अमृतसरमधून खासदार होते.

यावर बोलताना सिद्धू यांनी सांगितले आहे की, मी राहुल गांधींच्या सभेत बोलण्यासाठी योग्य व्यक्ती आहे की नाही याची कल्पना नाही. एक चांगला वक्ता किंवा पक्ष प्रचारक म्हणून मी योग्य आहे की नाही हेदेखील माहित नाही. मला बोलावणे माझ्या हातात नाही. पण या सगळ्यांवरुन एक गोष्ट स्पष्ट आहे की मला पक्षाने माझी खरी जागा दाखवली आहे. यासोबतच आगामी लोकसभा निवडणुकीत कोण पक्षाचा प्रचार करणार आहे हे देखील स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment