अमेरिकेत ट्रान्सजेंडरने दिला बाळाला जन्म!

transgender
अमेरिकेतील एका स्त्रीची पुरुष झालेल्या ट्रान्सजेंडरने बाळाला जन्म दिला आहे. पण या ट्रान्सजेंडरला स्त्रीची पुरूष होण्याच्या प्रक्रियेदरम्यान गर्भधारणा आणि नंतर बाळाला जन्म देणे फार त्रासदायक ठरले. याबाबतचे अनुभव अमेरिकेतील वायली सिम्पसनने त्यांचे बाळ सहा महिन्यांचे झाल्यानंतर शेअर केले आहेत.
transgender1
अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात पार्टनर स्टीवन गॅथसोबत २८ वर्षीय वायली सिम्पसन राहतात. त्यांनी २१ वर्षांची असताना पूरूष होण्याची शारीरिक प्रक्रिया सुरू केली होती. त्यांना यादरम्यान मासिकपाळी येणे बंद झाली होती आणि त्यांना डॉक्टरांनी सांगितले होते की, त्या गर्भधारणा करू शकणार नाहीत. पण त्यांना फेब्रुवारी २०१८ मध्ये अशी माहिती मिळाली की, त्यांची टेस्टोस्टेरॉन थेरपीनंतरही गर्भधारणा झाली आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
transgender2
आता सर्जरीच्या माध्यमातून वायली यांनी स्तनही शरीरापासून वेगळे असून पण त्यांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय कायम ठेवला. पण हा प्रवास या कपलसाठी सोपा नव्हता. त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या वाईट वागण्याचा सामना त्यांना करावा लागला. वायली यांनी सिजेरियनच्या माध्यमातून सप्टेंबर २०१८ ला एका मुलाला जन्म दिला. त्यांनी रोवन असे या मुलाचे नाव ठेवले आहे. सहा महिन्यांचा हा मुलगा झाल्यावर त्यांनी आपल्या या प्रवासाचे अनुभव जगासमोर आणले. वायली सांगतात की, पहिल्यांदाच कुणी गर्भवती पुरूषाला पाहिले असेल. मी जेव्हाही रस्त्याने जात होतो, तेव्हा लोक मला म्हणायचे की, मी कधीच पुरूष होऊ शकणार नाही. कारण पुरूष कधी बाळांना जन्म देत नाहीत. आपल्या बाळा पाहिल्यावर वायली सांगतात की, माझ्या बाळाच्या आनंदासमोर सर्व त्रास, अडचणी आणि वाईट वागणे काहीही नाही.

Leave a Comment