नीरव मोदीचे असे होते बॉलीवुड कनेक्शन

celebraties
पंजाब नॅशनल बँकेला कोट्यावधी रुपयांचा चूना लावणारा हिरे व्यापारी नीरव मोदी सध्या लंडनच्या वेस्ट एन्डमध्ये आरामदायी जीवन जगत आहे. तिथे त्याने एक नवीन डायमंड व्यवसाय सुरू केला आहे. त्याचे दागिने जगभरात प्रसिद्ध आहेत. परदेशातील अनेक सेलिब्रिटीजने त्याच्या दागिन्यांचा प्रचार केला आहे. बॉलीवूडबरोबर नीरव मोदीचे खुप जवळचे संबंध असून त्याच्या ब्रँडच्या दागिण्याचा प्रियंका चोप्रा, लिसा हेडन, जॅकलीन फर्नांडीज आणि सोनम कपूर यांनी प्रचारही केला आहे.
celebraties1
प्रियंका चोप्रा: बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही नीरव मोदीच्या ज्वेलरी ब्रांडची ब्रँड अम्बेसडर होती. त्याचबरोबर तिने देखील त्याच्या दागिण्यांचे प्रमोशन देखील केले होते. ब्रँडच्या उत्पादनासह तिचे फोटो इंस्टाग्रामवर पाहिले जाऊ शकतात.
celebraties2
लिसा हेडन: सुपर मॉडेल अभिनेत्री लिसा हेडन हिला देखील अनेकदा त्याच्या दागिन्यांचे प्रमोशन करताना पाहिले गेले आहे. लिसा हेडन त्याच्या प्रिंटमीडियामधील जाहिरातींमध्येही झळकले होती. ती विदेशात त्याच्या ब्रांडचा चेहरा होता. त्याने तिला न्यूयॉर्कमध्ये लॉन्च केले.
celebraties3
सोनम कपूर आणि जॅकलीन फर्नांडीजः फॅशन आयकॉन सोनम कपूर आणि जॅकेलिन फर्नांडिस यांनी देखील बऱ्याचदा नीरव मोदींच्या दागिन्यांचा प्रचार केला आहे.
celebraties4
निमरात कौर – 48 वर्षीय मोदी हा प्रसिद्ध डायमंड ब्रोकर आहे. मोदींच्या नावावर त्याचे दागिने ब्रँड म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. केवळ देशच नव्हे तर जगभरातील बऱ्याच सेलिब्रिटीजने या ब्रँडच्या दागिन्यांचे प्रमोशन केले आहे. यात अभिनेत्री निमरात कौर हिचा देखील समावेश आहे.

Leave a Comment