एआयएडीएमकेच्या मंत्र्याची नरेंद्र मोदींना ‘डॅडी’ची उपमा

AIADMK
चेन्नई – तामिळनाडू सरकारमधील मंत्री केटी राजेंद्र बालाजी यांनी नरेंद्र मोदींना चक्क ‘डॅडी’ची उपमा दिली आहे. तुमचे वडिल कोण ? असा प्रश्न एआयएडीएमके पक्षाचे नेते आणि तामिळनाडू सरकारमधील दुग्ध विकासमंत्री यांना विचारण्यात आला होता. बालाजी यांनी त्यावर, मोदी इज अवर डॅडी असल्याचे म्हटले आहे. तसेच आमच्या पक्षाचेही मोदी हे बाप असल्याचे ते म्हणाले.

भाजपसोबत एकत्र येण्याचे एआयएडीएमके पक्षाच्या दिवंगत नेत्या आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी टाळले होते. पण तरीही भाजपसोबत आपल्या पक्षाने युती का केली, असा प्रश्न बालाजी यांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना जर जयललिता या अम्मा असू शकतात. तर नरेंद्र मोदी हे डॅडी. कारण, मोदींनी आम्हाला पाठिंबा दिला आणि अम्मांप्रमाणे मार्गदर्शनही करतात, असे बालाजी यांनी म्हटले आहे.

जयललिता जेव्हा जिवंत होत्या, तेव्हा त्यांच्याकडे पक्षांची धुरा होती. त्यावेळी, त्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय होता. मात्र, आता अम्मांच्या नंतर मोदी हेच आमचे पिता आहेत, ते पुर्ण देशाचे पिता आहेत. म्हणून, आम्ही त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे. भाजप आणि एआयएडीएमके यांची गेल्याच आठवड्यात आघाडी झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत.

Leave a Comment