एरियल स्ट्राईकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह अद्याप बालाकोटमध्येच

aerial-strike
नवी दिल्ली – पाकिस्तानच्या बालाकोट येथे असलेला दहशतवाद्यांचा तळ भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारीला एरियल स्ट्राईक करून उद्ध्वस्त केला होता. भारतात या कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या संख्येवरून राजकारण रंगले आहे. तर या कारवाईत कुणाचाही मृत्यू झाला नसल्याचा दावा पाकिस्तानही करत आहे. पण अनेक दहशतवादी भारतीय हवाई दलाने केलेल्या या जबरदस्त कारवाईत ठार झाले असून, अद्यापही त्यांचे मृतदेह बालाकोट येथेच पडून असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. घटनास्थळी दहशतवाद्यांचे मृतदेह पडून असल्यानेच पाकिस्तानी सरकार आणि लष्कराकडून प्रसारमाध्यमांना तिथे जाण्याची अनुमती देण्यात येत नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

भारताने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर कारवाई केली. पण ही कारवाई जगासमोर येऊ नये म्हणून पाकिस्तान धडपडत आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये ज्या ठिकाणी हल्ला केला. त्या ठिकाणी पाकिस्तानचे सुरक्षा अधिकारी मीडियाला जाऊ देत नाही आहेत. त्या ठिकाणी जाण्यास मीडियाला बंदी घालण्यात आली आहे.

याचा अनुभव न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या एका टीमला आला. भारताकडून करण्यात आलेल्या कारवाईत भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोटमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ दहशतवादी संघटनेच्या तळांना लक्ष केले होते. याठिकाणी जाण्यास पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी मीडिया टीमला जाण्यास विरोध करण्यात आला.

Leave a Comment