या घरात लोक चक्क येतात मरण्यासाठी

varanasi
मानव जन्म हा एकदाच भेटतो आणि आनंदाने जगावे असे प्रत्येकाला वाटते. मरण कोणालाही नकोसे असते. पण आपल्यातील काहीजणांचे आकस्मिक निधन होते. त्यातच आपल्या कोणत्या व्यक्तीचे निधन झाले तर आपल्याला अतीव दुःख होते. पण आम्ही आज तुम्हाला एका अशा ठिकाणाची माहिती सांगणार आहोत जिथे माणसे चक्क मोक्ष प्राप्तीसाठी येतात. ते ठिकाण आहे उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये. या ठिकाणी एक असे घर आहे जिथे लोक आपल्या मृत्युची आतुरतेने वाट बघतात. 1908 पासून हे मुक्ती भवन म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी एक वही आहे ज्यात येथे प्रवेश घेतलेल्यांची नावे आहेत. जे आता या जगात नाहीत.
varanasi1
या ठिकाणी हिंदू धर्मावर आस्था असणारे जगभरातील लोक शेवटच्या दिवसात येतात. 12 खोल्या या भवनात असून तिथे मंदिर आणि पुजारीही असतो. मृत्यूच्या जवळ जे लोक आहेत, येथे त्यांनाच प्रवेश मिळतो. दोन आठवडे राहण्याची परवानगी मिळते. येथे रोज 75 रुपये द्यावे लागतात. जास्त पैसे मिळाले तर मोक्ष आणि ईश्वराचे संगीत ऐकवायला गायक असतो. रोजच्या 75 रुपयांत झोपण्यासाठी गादी, चादर, उशी दिली जाते. पिण्यासाठी पाण्याचा माठ असतो. आत येणाऱ्या व्यक्तींनी कमीत कमी सामान घेऊन आत यायचे असते.
varanasi2
तेथील पुजारी सकाळ आणि संध्याकाळ आरतीनंतर अंगावर गंगाजल शिंपडतात, म्हणजे मुक्ती मिळू शकेल, अशी भावना असते. मुक्ती भवनात दोन आठवडे राहिल्यानंतर मृत्यू झाला नाही, तर मुक्ती भवन सोडावे लागते. मग त्या व्यक्तीला वाराणसीतच बाहेर हॉटेल किंवा धर्मशाळेत ठेवले जाते. म्हणजे मृत्यू वाराणसीतच व्हावा. वारासणीत मृत्यू झाला तर मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे. पूर्वी येथे मुक्ती भवनासारखी अनेक घरे होती. पण आता बाकीची हॉटेल्स झाली आहेत.

Leave a Comment