सोशल मीडियात दिशा पटनीने पुन्हा लावली आग

disha-patni
‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटामधून अभिनेता सुशांत सिंग राजपूत सोबत बॉलिवूडमध्ये दिशा पटनीने पदार्पण केले होते. या चित्रपटात तिची भूमिका छोटीशी असली तरी ती प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरली. ती त्यानंतर टायगर श्रॉफ सोबत ‘बागी 2’ या चित्रपटामध्ये दिसली.
disha-patni1
पण आता दिशा सोशल मीडियावर आपल्या बिकिनीमधील फोटो शेअर केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिशा या फोटो खुप ग्लॅमरस दिसत असून तिचे हे फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत.
disha-patni2
याअगोदरही दिशाने इंस्टाग्रामवर अनेकदा आपले बिकिनी लूक शेअर केला आहे. ती आपली फिट बॉडी फ्लॉन्ट करण्याची कोणतीच संधी सोडत नाही. तिने काही दिवसांपूर्वी केल्विन केलिनसाठी केलेल्या बिकिनी फोटोशूटचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता.
disha-patni3
लवकरच सलमान खानच्या ‘भारत’ मध्ये दिशा पटनी एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून ती यासाठी खूप मेहनतही घेत आहे. दिशाचे स्टंट सीनही या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी यांच्या अफेअरच्या चर्चा सध्या सुरू असल्या तरी अद्याप या दोघांनी मात्र उघडपणे आपल्या नात्याची कबूली दिलेली नाही.

Leave a Comment