हेडफोन लावून झोपी गेला आणि सकाळी बहिरा झाला

headfone
संगीत कोणत्याही रोगावर प्रभावी करते आपण ऐकलेच असेल पण अति संगीत ऐकल्यावर काय परिणाम होतात याची प्रचिती नुकतीच तैवानच्या तायचुंग येथे आली आहे. येथील एक विद्यार्थी रात्री हेडफोन लावून झोपी गेला. पण दुसऱ्यादिवशी त्याला जेव्हा जाग आली तेव्हा तो बहिरा झाला होता.

या संदर्भातील वृत्त डेलीमेलने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार सध्या एका विद्यार्थ्यावर तैवान आशिया यूनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून याबाबत माहिती देताना डॉक्टर्सनी सांगितलं की, या विद्यार्थ्याचा एका कान पूर्णपणे निकामी झाले आहेत. पण त्याचा एक काम करत आहे, कारण रात्री झोपेत त्याच्या एका कानातून हेडफोन निघाला असेल. असे झाले नसते तर तो दोन्ही कानांनी बहिरा झाला असता.

याबाबत एक तज्ञ डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, झोपताना कानाला हेडफोन लावून झोपू नये. याने अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. रात्री आपल्या शरीरातील रक्तदाब दिवसाच्या तुलनेत स्लो डाउन होत असतो. आपल्या कानाच्या केसांपर्यंत रात्री फार कमी रक्त पोहोचते. त्यामुळे रात्री हेडफोन लावणे दिवसाच्या तुलनेत अधिक धोकादायक असते.

Leave a Comment