आनंद महिंद्रांचे नेटकऱ्याला ‘शॉकिंग’ उत्तर

anand-mahindra
नवी दिल्ली: महिंद्रा ग्रुपने नुकतीच नवीन लक्झरी इलेक्ट्रिक कार ‘हायपर कार’ Battista लॉन्च केली. या कार बद्दल असे सांगितले जाते की तिचा वेग फॉर्मूला 1 कारपेक्षा अधिक असेल. ही गाडी जीनिव्हा मोटर शोमध्ये सादर करण्यात आली. सोशल मीडियावर या कारचे फोटो पाहून अनेकांनी तिचे खूप कौतुक केले, परंतु त्या दरम्यान एका व्यक्तीने ट्विटरवर विचारले की … Sir, kitna deti hai? त्या ट्विटला महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी मजेदार उत्तर देत सांगितले की … Sirji, electric hai..Shock deti hai!


आपल्या माहितीसाठी हा हायपरकार महिंद्रा ग्रुपची Automobili Pininfarina तयार केली आहे. आनंद महिंद्रा यांनी या लक्झरी कारचा व्हिडीओ स्वतः आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.
Pininfarina नुसार, Battista ही पहिली हायपरकार आहे, जी अल्ट्रा लाइट आणि अल्ट्रा-फास्ट एरोडायनामिकसह बनविण्यात आली आहे. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन ट्विटच्या उत्तरानंतर, सोशल मीडियावरील त्यांची स्तुती थांबली नाही. या मजेशीर टिप्पणीवर लोक खूप प्रतिक्रिया देत आहेत.

Leave a Comment