मुकेश अंबानीनी केले 50 हजार पोलिसांचे तोंड गोड

mithai
देशातील बडे उद्योजक आणि आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश आज म्हणजे ९ मार्च रोजी श्लोका मेहता हिच्याबरोबर विवाहबद्ध होत आहेत. लग्नाच्या आदल्या दिवशी मुकेश अंबानी यांनी मुंबई पोलिसांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मुकेश यांनी मुंबई पोलीस विभागात कार्यरत असलेल्या ५० हजार अधिकारी, कर्मचारयाना मिठाईचे डबे पोहोचविले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांवर हे डबे पोहोचविले गेले. त्यात मुकेश, नीता अंबानी आणि त्यांच्या मुलांची नावे असलेले एक कार्ड होते आणि त्यावर श्लोकासोबत आकाश विवाहबद्ध होत असून या आनंदाप्रित्यर्थ तोंड गोड करत आहोत. आपले आशीर्वाद आणि शुभकामना हव्यात असा मजकूर आहे.

आकाश आणि श्लोका यांचा विवाह सोहळा ९ ते ११ मार्च असा तीन दिवसांचा असून आज दुपारी साडेतीन वाजता वरात निघणार आहे. जिओ सेंटर मध्ये हा विवाह संपन्न होत आहे.

Leave a Comment