एव्हान्काच्या महिला फंडासाठी ट्रम्प देणार ७०० कोटी

ivanka
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२० च्या बजेटमध्ये ग्लोबल महिला फंडासाठी १०० दशलक्ष डॉलर्स म्हणजे ७०० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. विशेष म्हणजे या महिला फंडाची प्रमुख म्हणून ट्रम्प यांची कन्या आणि सल्लागार इव्हंका काम पाहत आहे. व्हाईट हाउसतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार सोमवारी हे बजेट प्रकाशित केले जाणार आहे. यात महिलांसाठी ग्लोबल डेव्हलपमेंट व समृद्धी साठी करावयाचे काम समाविष्ट आहे.

या फंडाच्या माध्यमातून आगामी ६ वर्षात ५ कोटी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे ध्येय ठरविले गेले आहे. त्यासाठी स्टेट डिपार्टमेंट आणि राष्ट्रीय सुरुक्षा कौन्सिल तसेच अन्य संस्थांची मदत घेतली जाणार आहे. यात महिलांना कामाचे प्रशिक्षण, अर्थ नियोजन, कायदा यासारख्या कार्यक्रमांचे सहाय्य घेतले जाईल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment