महिला दिनानिमित्त राजमाता जिजाबाईना अनोखा सन्मान

saree
८ मार्च हा दिवस जगभरात महिला दिन म्हणून साजरा होतो तसा तो भारतात साजरा झाला मात्र महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराज याच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांना या निमित्ताने एका महिला पेंटरने अनोखा सन्मान दिला आहे. श्रुतिका वाघ या पेंटरने जोगेश्वरी येथे १२५ फुट लांबीच्या कॉटन साडीवर जीजाबाईचा विवाह ते शिवाजी राजांचा राज्याभिषेक हा प्रवास चित्रातून साकारला आहे. श्रुतीकाच्या म्हणण्यानुसार साडीवर केले गेलेले हे पहिलेच बयोपिक पेंटिंग आहे.

penting
श्रुतिका म्हणते, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे. राज्यात एकही गाव असे नसेल जेथे महाराजांचा पुतळा नाही. मात्र शिवाजीराजांच्या या यशात त्यांच्या आईचे म्हणजे जिजाबाईंचे योगदान फार मोठे आहे. राजांचे त्यांनी केवळ लालनपालन केले असे नाही तर राजकीय चातुर्य, न्यायबुद्धी, धोरणी निर्णय, साहस, शौर्य हे धडे त्यांना आईने दिले. आपण जेव्हा असे म्हणतो कि राजे पुन्हा जन्माला यायला हवेत तेव्हा जिजाबाई असल्याशिवाय ते शक्य नाही म्हणून जिजाबाई सुद्धा पुन्हा जन्माला यायला हव्यात.

श्रुतिकाने हे पेंटिंग साकारण्यापूर्वी दीड वर्ष जिजाबाई यांच्या संदर्भातले बरेच साहित्य वाचून काढले होते. हे पेंटिंग बनविताना त्याचा खूप उपयोग झाला. हे पेंटिंग बनविण्यासाठी तिला १४४ तास लागले आणि काळा, लाल आणि सोनेरी रंग त्यासाठी वापरला गेला आहे.

Leave a Comment