वयाच्या 69व्या वर्षी बाप झाला शिल्पा शेट्टीची जबरदस्ती किस घेणार अभिनेता

richard-gere
२००७ साली जयपूरमधील एका कार्यक्रमात हॉलीवूडच्या एका अभिनेत्याने बॉलीवूड सुपर फिट अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा जबरदस्ती किस घेतला होता. हे तर तुम्हालाच माहितच असेल आणि त्यानंतर जे महाभारत घडले त्यात तुमचा देखील समावेश असेलच. त्या अभिनेत्या टीकेचा एवढा भडीमार झाला की या दोघांविरोधात एका सामाजिक संस्थेने अश्लिलतेचा प्रचार केल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर त्यांनी याबाबत पोलिस तक्रार देखील केली होती. पण न्यायालयाने त्यावेळी केवळ हा एक पब्लिसिटी स्टंट आहे असे असे सांगून याचिका फेटाळून लावली होती.

शिल्पा शेट्टीची जबरदस्ती किस घेणारे हॉलिवूडचे दिग्गज अभिनेते रिचर्ड गेर वयाच्या ६९व्या वर्षी बाबा झाले आहेत. त्यांची तीसरी पत्नी अलजेन्ड्रा सिल्व्हा हीने आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. रिचर्ड यांचे हे तिसरे अपत्य असून याआधी त्यांना दोन पत्नींपासून दोन मुले आहेत. रिचर्ड गेर हे १९८० -९०च्या दशकात हॉलिवूड सिनेसृष्टीतील सुपरस्टार होते. त्यांनी ऑस्कर व गोल्डन ग्लोब पुरस्कारांवरही आपले नाव कोरले आहे. त्यांच्या प्रीटी वुमन, प्राइमल फियर, अमेरिकन जिगोलो, शॅल वी डान्स या चित्रपटांनी तुफान यश मिळवले होते. काळानुरुप त्याला आपल्या अभिनयामध्ये बदल करणे शक्य झाले नाही. परिणामी ताज्या दमाच्या अभिनेत्यांपुढे प्रेक्षकांमधील लोकप्रियता ढासळली. त्यामुळे रिचर्डचे चित्रपट गर्दी खेचण्यात अपयशी ठरले.

रिचर्ड गेर यांची अलजेन्ड्रा सिल्व्हा ही तीसरी पत्नी आहे. त्यांनी याआधी अभिनेत्री सिंडी क्रॉफर्ड व केरी लॉवेल या दोघींशी लग्न केले होते. २०१५ साली त्यांनी आपली दुसरी पत्नी सिंडी क्रॉफर्डला घटस्फोट दिला. त्यानंतर ते ३५ वर्षीय अभिनेत्री अलजेन्ड्रा सिल्व्हाला डेट करु लागले. गेल्याच वर्षी दोघांनी लग्न केले.

Leave a Comment