
बी-टाऊनमध्ये आता पुन्हा एकदा सनई चौघडे वाजण्याची शक्यता आहे. कारण बी-टाऊनमधील सध्या चर्चेत असलेली आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण ही जोडी जिथे जाईल तिथे त्यांना लग्नाबद्दल असंख्य प्रश्न विचारून भंडावून सोडले जाते. पण हे दोघेही तेवढ्याच चालाखीने त्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळतात.
2020च्या सुरुवातीला विवाहबद्ध होणार आलिया-रणबीर?
रणबीर कपूरचे वडील अर्थात ऋषी कपूर हे सध्या अमेरिकेत उपचार घेत असून ते या महिना अखेरीस मायदेशी परतण्याची शक्यता आहे. ते भारतात परतल्यानंतर या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यात येण्याची शक्यता आहे. 2020च्या सुरुवातीला दोघंही विवाहबंधनात अडकतील अशा चर्चा बॉलिवूडमध्ये आहेत. दरम्यान या दोघांनी आपल्या लग्नांच्या चर्चांवर प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
