
अभिनेत्री कंगणा राणावतच्या मणिकर्णिका या चित्रपटाने यावर्षीच्या सुरुवातीलाच बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली. या चित्रपटात कंगणाचा वेगळाच अवतार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आता कंगणा एका आगळ्यावेगळ्यात अंदाजात आपल्या भेटीला येणार आहे. नुकतीच कंगणाच्या आगामी ‘पंगा’ चित्रपटाचा फर्स्टलूक आणि प्रदर्शनाची तारिख निश्चित करण्यात आली आहे.
कबड्डीपटू बनून ‘पंगा’ घेणार कंगणा
आगामी ‘पंगा’ चित्रपटातून कंगणा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटू यांच्यावर ‘पंगा’ चित्रपट आधारित आहे. कंगणा चित्रपटात कबड्डी खेळताना दिसणार आहे. कंगणाच्या या आगामी चित्रपटाचा फर्स्टलूक आणि प्रदर्शनाची तारिख ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी शेअर केली आहे. ‘पंगा’ 24जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगणासोबत प्रसिद्ध पंजाबी अभिनेता जस्सी गिल स्क्रिन शेअर करणार आहे. कंगणाचा जस्सी गिलसोबत हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटात कंगणाच्या पतीची भूमिका जस्सी गिल साकारणार आहे. जस्सी व्यतिरिक्त चित्रपटात ऋचा चड्ढा आणि नीना गुप्तादेखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
