जगात असा एक देश आहे जेथील महिला आहेत सर्वाधिक आनंदी

finland
आज जागतिक महिला दिन संपूर्ण जगात आनंदाने साजरा केला जात आहे. या दिवसाच्या माध्यमातून महिलांना शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत. पण आम्ही आज तुम्हाला जगातील एका अशा देशाबद्दल सांगणार आहोत, जेथील महिला सर्वाधिक आनंदी आहेत.

दरवर्षी जागतिक आनंद अहवाल संयुक्त राष्ट्र सादर करते. जगभरातील प्रमुख देशांमध्ये जाऊन युनायटेड नेशनचे प्रतिनिधी एक व्यापक सर्वेक्षण करतात. त्यानंतर हा सर्व्हे आर्थिक, मनोवैज्ञानिक आणि सर्व्हेचे जाणकार याचे निरीक्षण करतात. या सर्व प्रक्रियेनंतर देशातील स्थिती, राष्ट्रीय घटना, संख्या याच्या आधारे नीट पडताळणी करुन जगातील सर्वात आनंदी देशांची अनुक्रमे यादी बनवली जाते. महिलांच्या आनंदी असण्याच्या प्रमाणावर यात विशेष लक्ष दिले जाते.

संयुक्त राष्ट्राच्या सन 2018च्या अहवालानुसार युरोपीय देश फिनलँडमध्ये जगातील सर्वाधिक आनंदी महिला राहतात. या अहवालानुसार फिनलँडमध्ये लोक आनंदी असणाऱ्यांचा स्कोर 7.632 एवढा आहे. हा यूएनच्या 156 देशांतील सर्वाधिक स्कोर आहे. 1 ते 10 मध्ये हा स्कोर दिला जातो. भारताचा आनंदी देशांमध्ये स्कोर 4.190 एवढा आहे. अनुक्रमानुसार या यादीत भारत 133 व्या क्रमांकावर आहे.

नॉर्वे, डेन्मार्क, आयर्लंड आणि स्वित्झर्लंड हे देश या यादीत फिनलँडच्या जवळपास आघाडीवर आहेत. स्वित्झर्लंड या यादीत पाचव्या स्थानावर असून त्यांचा स्कोर 7.487 एवढा आहे. यूएनच्या या अहवालानुसार जीडीपीवर सोशल सपोर्ट, निरोगी राहण्याची लवचिकता आणि त्यानुसार आपले जीवन निवडण्याचं स्वातंत्र्य, लिंग समानता इ. गोष्टींचा सामावेश करण्यात आला आहे. या महिन्यात या वर्षीचा अहवाल प्रकाशित करण्यात येणार आहे. भारताची स्थिती यावर्षी सुधारलेली असेल अशी आशा आहे. कारण भारताचा शेजारी देश पाकिस्तान भारताच्या बराच पुढे आहे. यूएनच्या 156 देशांच्या यादीत भारत सध्या 133 व्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान 75 व्या, बांग्लादेश 115 व्या, श्रीलंका 116 व्या, नेपाळ 101 व्या, भूतान 97 व्या आणि म्यानमार 130 व्या स्थानावर आहेत.

Leave a Comment