आता संपूर्ण देशात असणार एकाच प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेन्स

license
नवी दिल्ली – देशातील वेगवगेळ्या राज्यात असलेल्या ड्रायव्हिंग लायसेन्सचे नमुने असल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी एक निर्णय घेतला असून या निर्णयानुसार यापुढे आता संपूर्ण देशात एकाच प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेन्स असणार आहे. त्यासाठी केंद्रीय मार्ग आणि वाहतूक मंत्रालयाने नवीन अधिसूचना जारी केली आहे.

केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 1 ऑक्टोबरपासून देशभर एक सारखेच ड्रायव्हिंग लायसेन्स बनवले जाणार आहेत. अधिसूचनेनुसार, देशाच्या प्रत्येक राज्यात ड्रायव्हिंग परवाना आणि नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) यांचे स्वरूप एकसमान असेल. या सर्व ड्रायव्हिंग परवान्यांचे आणि आरसीचे रंग समान असतील आणि यात परवाना धारक किंवा वाहन मालकांशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असेल.

परिवहन मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आतापर्यंत अनेक राज्यांनी त्यांच्या सोयीनुसार विविध प्रारूपांवर ड्रायव्हिंग परवान्या आणि आरसी जारी केले आहेत. त्यामुळे इतर राज्यांमध्ये वैधतेला घेऊन शंका निर्माण होते. परंतु संपूर्ण देशामध्ये एकसमान वाहनचालक परवाना आणि आरसी असल्यामुळे ही गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही.

अधिसूचनेनुसार, सर्व राज्यांना ऑक्टोबर आणि आरसी पीव्हीसी किंवा पॉली कार्बोनेटवर ड्रायव्हिंगचे परवाने द्यावे लागणार आहेत. त्यात एक चिप असेल ज्यामध्ये सर्व माहिती केंद्र सरकारच्या स्वरूपानुसार जोडावी लागणार आहे.

Leave a Comment