टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली सनीची कार्बन कॉपी

sunny-leone
बी-टाऊनची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनला आता सिनेसृष्टीने स्वीकारले आहे. पण सुरुवातीच्या काळात तिला खुप संघर्ष करावा लागला होता. पण तिने आता आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. इतर सेलिब्रेटींप्रमाणे तिचे देखील असंख्य चाहते आहेत. पण सध्याच्या घडीला सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे सनीची कार्बन कॉपी समोर आली आहे. सनी लिओनसारखी हुबेहूब ही मुलगी दिसत असल्याने सोशल मीडियावर आता तिची खूप चर्चा होत आहे.

टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली ही मुलगी पूजा लिओन नावाने प्रसिद्ध आहे. तिचा व्हिडीओ सध्या ट्रेंडिंगमध्ये असून पूजाचे या अॅपवरील वेगवेगळ्या डायलॉग आणि गाण्याच्या व्हिडिओमधील हावभाव पूर्णपणे सनीशी मिळते जुळते असल्यामुळे लोक आता तिला सनीची जुळी बहीण म्हणून ओळखू लागले आहेत. युट्युबवर ‘डुप्लिकेट सनी लिओन’ म्हणून ओळखली जात असल्यामुळेच पूजाने कदाचित आपल्या नावापुढे लिओन हे आडनाव लावले असावे. पूजाचे खरे नाव पूजा मिश्रा असून सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Leave a Comment