ज्याच्यावर लाखो मुली फिदा; असा बांगलादेशचा ‘शाहरुख खान’ गजाआड

hero-alom
ढाका – आपल्या लुक्स आणि म्युझिक व्हिडीओमुळे बांगलादेशचा शाहरुख खान म्हणजेच हीरो अलोम अवघ्या सोशल मीडियाला परिचयचा आहे. त्याला पाहून प्रत्येकजण म्हणायचा की, ‘हीरो अलोम- ज्याच्यावर प्रत्येक मुलीचा जीव आहे…’ हा हीरो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळी अलोम त्याच्या व्हिडीओमुळे नाहीतर त्याने केलेल्या गुन्ह्यामुळे चर्चेत आला आहे. त्यामुळे अलोमची रवानगी तुरुंगात देखील होऊ शकते.

मेहुणा आणि पत्नी साइदा बेगम सूमीने काही दिवसांपूर्वी हीरो अलोम (मूळ नाव- अशरफउल हुसैन अलोम) विरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवली होती. हीरो अलोमनेही यानंतर मेहुणा आणि पत्नीविरुद्ध तक्रार केली. अलोम यात म्हणाला की, पत्नी आणि मेहुण्याने अजून तिघांच्या मदतीने त्याचे शोषण केले आणि घरातून काही पैसे घेऊन पळून गेले. पोलिसांनी याप्रकरणी सुरुवातीला प्रकरण सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यात फारसे यश मिळाले नाही. यानंतर हीरो आलोमविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आणि त्याला अटकही करण्यात आली.
hero-alom1
एका स्थानिक रुग्णालयात हीरो अलोमची पत्नी उपचार करून घेत होती. ती म्हणाली की, अलोम एक चांगला नवरा नाही, तो कुटुंबाकडे कधीच लक्ष देत नाही. तसेच अलोमचे अनेक अफेअर होते आणि तिला शंका आहे की त्याने ढाकामध्ये अजून एक अवैध लग्न केले असल्यामुळे तो दिवस- रात्र फोनवर बोलत असतो. याबद्दल सूमीने त्याला विचारले असता अलोमने तिला मारहाणही केली होती.

Leave a Comment