बनावट व्हिडीओ: पाकिस्तानी चहा कंपनीचा ब्रांड अम्बेसिडर बनला अभिनंदन

tapal
पाकिस्तानी चहा कंपनी तपल दाणेदार चहाने बनावट व्हिडीओ बनवून भारतीय वीर, फायटर पायलट विंग कमांडर अभिनंदन याला कंपनीचा ब्रांड अम्बेसिडर बनविले आहे. या संदर्भातला एक व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाला असून ट्रेडिंग मध्ये आहे.

२६ मार्चला पाकिस्तानातील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाच्या विमानांनी बॉम्बफेक केल्यावर त्याला उत्तर म्हणून भारतीय हवाई हद्दीत आलेल्या पाकिस्तानी एफ १६ विमानावर निशाना साधून ते विमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन यांचे मिग २१ पाकिस्तानात कोसळले आणि अभिनंदन पाक हद्दीत पडल्याने त्यांना पाक लष्कराने ताब्यात घेतल्याचे आपण माध्यमातून वारंवार पहिले. त्यावेळी पाक लष्कर अधिकाऱ्यांनी अभिनंदन यांना चहा दिल्याचे व त्यांच्या हातात चहाचा कप असल्याचे आणि अभिनंदन यांनी चहा चांगला असल्याचे व्हिडीओ प्रसारित झाले होते. त्याचा फायदा आपल्या चहाच्या विक्रीत वाढ करण्यासाठी तपल दाणेदार चहा कंपनीने घेतला असून चहा पितानाचा आणि चहाचे कौतुक करतानाचा अभिनंदन याच्या फोटोचा वापर करून या कंपनीने बनावट व्हिडीओ शेअर केला आहे. अनेक लोक हा बनावट व्हिडीओ शेअर करत आहेत.

Leave a Comment