फोल्डेबल स्मार्टफोन विसरा, येतोय स्ट्रेचेबल स्मार्टफोन

strech
यंदाचे वर्ष स्मार्टफोन बाजारात फोल्डेबल आणि ५ जी सपोर्ट फोनचे असणार आहे. सॅमसंग, हुवावे या कंपन्यांनी त्याचे फोल्डेबल फोन आणले असून अॅपलने फोल्डेबल फोनसाठी पेटंट दाखल केले आहे असे सांगितले जात आहे. मात्र या सर्वांवर कडी करताना इलेक्ट्रोनिक कंपनी एलजीने स्ट्रेचेबल स्मार्टफोनची तयारी सुरु असल्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने पेटंट अर्ज दाखल केला आहे.

एलजीने कंपनी युनिक डिझाईनच्या स्मार्टफोनवर काम करत असल्याचे जाहीर केले असून हा फोन स्ट्रेचेबल असेल. म्हणजे हा फोन चारी बाजूनी स्ट्रेच करता येईल म्हणजे त्याचा डिस्प्ले कोणत्याची दिशेने खेचून मोठा करता येईल तसेच तो दाबून कमीही करता येणार आहे. यामुळे युजर गरजेप्रमाणे स्क्रीन साईज कमी अथवा मोठा करू शकेल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment