म्हणून धोनीने पॅव्हेलियन उद्घाटनास दिला नकार

ranchi
झारखंडच्या रांची मध्ये शुक्रवारी ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया याच्यात तिसरा एक दिवसीय सामना होत आहे आणि याचवेळी या स्टेडियम मध्ये महेंद्रसिंग धोनी याच्या नावाच्या पॅव्हेलियनचे उद्घाटन होत आहे. टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी कुल कॅप्टन म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा शांत स्वभाव आणि डोके थंड ठेऊन कृती करण्याची पद्धत यामुळे त्याला कुल म्हटले जाते. त्याच्या या स्वभावाचा आणि नम्रतेचा अनुभव पुन्हा एकदा आला आहे.

झारखंड क्रिकेट असो. चे सचिव देवाशिष चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार असो. ने या पॅव्हेलीयनचे उद्घाटन धोनीनेच करावे यासाठी त्याची वेळ मागितली. पण धोनीने उद्घाटनास नकार दिला. त्यामागचे कारण देताना धोनी म्हणाला, मी उद्घाटन केले तर मी कुणी बाहेरचा आहे असे वाटेल. मी या स्टेडीयमचा भाग आहे आणि घरातला मुलगा आपल्याच घरात कधी उद्घाटन करतो का? त्यामुळे पदाधिकाऱ्यानाही अधिक काही बोलता आले नाही आणि विना उद्घाटन हे पॅव्हेलियन सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी आज खुले करण्याचा निर्णय घेतला गेला. धोनीची ही कृती त्यांच्या चाहत्यांना खुश करून गेली असेहि समजते.

अश्या प्रकारचे पॅव्हेलियन दिल्लीत वीरेंद्र सेहवाग आणि मुंबईत सचिन तेंडूलकर याच्या नावाने बनविले गेले आहे.

Leave a Comment