
टीम इंडियाचा माजी कप्तान मोहम्मद अझरूद्दीन याचा मुलगा असद आणि टेनिसस्टार सानिया मिर्झा हिची बहिण अनम या वर्षअखेरी निकाह करणार असल्याचे वृत्त आहे. असद २५ वर्षाचा असून तो क्रिकेटपटू आहे आणि गोवा रणजीसाठी त्याची निवड झाली आहे तर सानियाची बहिण अनम २८ वर्षाची असून फॅशन डिझायनर आहे. तिचा स्वतःचा लेबल बाजार नावाचा फॅशन ब्रांड आहे.
अझरूद्दीनचा मुलगा असद आणि सानियाची बहिण अनम करणार निकाह
असद आणि अनम अनेक दिवस डेटिंग करत आहेत. ही दोन्ही कुटुंबे हैद्राबादची आहेत. अनम स्वतःच्या फॅशन ब्रांडसाठी मॉडेलिंग करतेच पण अनेकदा सानिया अनमने डिझाईन केलेले कपडे घालते. अनमने तिचे असद बरोबरचे अनेक फोटो इन्स्टाग्राम अकौंटवर शेअर केले आहेत. अनमने २०१६ मध्ये अकबर रशीद याच्सोअसबत हैद्राबादच्या फलकनुमा पॅलेस मध्ये लग्न केले होते पण तिने घटस्फोट घेतल्याची बातमी अजून तरी आलेली नाही.
