मोदींसाठी लकी चेअर तयार

khurchi
निवडणुका जवळ येत चालल्या असताना राजकीय पक्षात आता श्रद्धा, अंधश्रध्दा याला उत येऊ लागला आहे. याचे उत्तम उदाहरण कानपूर येथे पाहायला मिळाले असून येथे पाच वर्षे काचेच्या पेटीत बंद करून ठेवलेल्या खुर्चीची नव्याने रंग रंगोटी सुरु झाली आहे. या खुर्चीवर जेव्हा जेव्हा पंतप्रधान मोदी बसले तेव्हा तेव्हा भाजपला अभूतपूर्व यश मिळाले असा भाजपा नेत्याचा दावा आहे. त्यामुळे ही लाकडी खुर्ची भाजपसाठी लकी चेअर बनली आहे.

८ मार्च रोजी मोदी यांची रॅली होत आहे त्यावेळी या खुर्चीवर मोदींना बसविले जाणार आहे. कानपूर जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र मैथानी या संदर्भात माहिती देताना म्हणाले, उत्तरप्रदेशात २०१३ मध्ये शंखनाद रॅली १९ ऑक्टोबर २०१३ ला झाली तेव्हा मोदी या खुर्चीत बसले होते. २०१४ मध्ये पुन्हा एकदा मोदी याच खुर्चीत बसले आणि ते पंतप्रधान झाले. सप्टेंबर २०१६ मध्ये मोदी या खुर्चीत बसले आणि उत्तर प्रदेशात भाजप बहुमतात आला. तेव्हा रॅलीसाठी जो डीलर खुर्च्या पुरवीत होता त्याच्याकडून ही खुर्ची विकत घेण्यात आली आणि काचेच्या पेटीत ठेवण्यात आली. आता पुन्हा एकदा या खुर्चीत मोदींनी बसावे अशी आमची इच्छा आहे.

Leave a Comment