जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विस्तारा एअरलाईन्सची महिलांना स्पेशल गिफ्ट

vistara
नवी दिल्ली – आठ मार्च रोजी असणाऱ्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विस्तारा एअर लाईन्सने नुकतीच आपल्या नव्या योजनेची घोषणा केली आहे. विमानामध्ये महिलांना मोफत सॅनिटरी पॅड देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विस्तारा एअर लाईन्सने घेतला आहे. याबाबतची माहिती विस्तारा एअरलाईन्सने ट्विट करत दिली आहे. ही सुविधा सध्या देशांतर्गत विमानप्रवासात महिलांसाठी सुरु करण्यात आली आहे. विस्ताराही असा निर्णय घेणारी देशातील पहिली एअरलाईन्स कंपनी ठरत आहे.


विस्तारा एअरलाईन्समध्ये पुरवण्यात येणारे पॅड्स हे ISO 9001:2015 सर्टिफाईड बायो डिग्रेडेबल आणि ऑर्गेनिक असतील. हे नॅपकिन्स प्लॉन्ट बेस फायबर पासून बनवलेले असून ते प्लॉस्टिक, टॉक्सिन्स आणि परफ्युम विरहीत असतील. विमानातील सर्व क्रू मेंबर्स ८ मार्चपासून सॅनिटरी पॅड्सबद्दल माहिती देतील. तुम्ही गरजेनुसार अगदी मोकळेपणाने विमानप्रवासात सॅनिटरी पॅडची मागणी करु शकता असे ट्विटमध्ये म्हटले आहे. ट्विट करत कंपनीने #PadsOnBoard हा हॅशटॅग वापरुन या नव्या सुविधेची माहिती दिली.

Leave a Comment