पाकिस्तानने 100 हून अधिक दहशतवाद्यांना केली अटक

pakistan
लाहोर – इस्लामिक दहशतवाद्यांविरूद्ध कारवाईची तीव्रता पाकिस्तानने वाढवली असून १८२ मदरशे नियंत्रणात घेतले असल्याची घोषणा पाकिस्तानी सरकारने केली आहे. त्यासोबतच बंदी घातलेल्या संघटनांशी संबधित असलेल्या १०० हून दहशतवाद्यांना पाकिस्तानने अटक केली आहे. योग्य नियोजन करून ही कारवाई करण्यात आल्याचे पाकिस्तानच्या मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानवर जागतिक स्तरावरून पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दबाव वाढत असल्यामुळे ही कारवाई देशातील १८२ मदरश्यांवर नियंत्रण व व्यवस्थापन करण्यासाठी करण्यात आल्याचे पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने सांगितले. तसेच १२१ समाजकंटकांना प्रतिबंधित कारवाई म्हणून तुरुगांत टाकण्यात आल्याचेही मंत्रालयाने सांगितले.

धार्मिक कट्टरतेचे शिक्षण या मदरशांमध्ये देण्यात येत असल्याने सध्या पाकिस्तानला त्यांच्याबाबतीत काय धोरण राबवायचे ही समस्या भेडसावत आहे. कट्टरतेकडे झुकलेल्या मुस्लीमांचे प्राबल्य पाकिस्तानमध्ये असल्यामुळे अशा धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरसांच्या माध्यमातून लाखो गरीब मुलांना भरती करण्यात आल्याचा अंदाज आहे.

Leave a Comment