असा आहे कलंकमधील वरुणचा खतरनाक लुक

varun-dhawan
करण जोहरच्या कलंक या चित्रपटात अभिनेता वरुण धवन झळकणार आहे, हे तर तुम्हाला माहितच आहे. पण नुकतेच या चित्रपटातील एक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. दरम्यान वरुण धवन या चित्रपटाचे शुटिंग सुरु असतानाचे फोटो देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असतो. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढत आहे.

हे पोस्टर शेअर करताना निर्माता करण जोहरने भावूक होत म्हटले आहे की, “एक असा चित्रपट, ज्याने माझ्या डोक्यात 15 वर्षांपूर्वीच जन्म घेतला आहे, एक असा चित्रपट, ज्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे, एक असा चित्रपट, ज्यावर माझ्या वडिलांनीही त्यांच्या निधनाच्या आधी काम केले आहे, या चित्रपटाला प्रत्यक्षात पाहणे वडिलांचे स्वप्न होते, त्यांचे स्वप्न मी पूर्ण करु न शकल्याने माझे मन मलाच खात होते, अखेर ते स्वप्न प्रत्यक्षात येत आहे. नाते आणि शाश्वत प्रेमाच्या कथेला आवाज मिळाला आहे. मला उत्सुकता आहे, काळजीत आहे आणि भावूक सुद्धा आहे. मला आशा आहे की, प्रेमाच्या या वाटचालीत तुम्हीही सहभागी व्हाल.


‘कलंक’ हा चित्रपट मल्टी-स्टारर असून अभिनेता वरुण धवनसोबतच अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता आदित्य रॉय-कपूर, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त आणि कुणाल खेमू या चित्रपटात दिसणार आहेत. अभिषेख वर्मन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात ‘कलंक’ चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment